Logo Company Logo
Shri Shivaji Education Society, Amravati's

Shri Shivaji Science College, Amravati

(Affiliated to Sant Gadge Baba Amravati University, Amravati (MS)
College Profile

NAAC: A+ Grade[CGPA 3.42] (4th Cycle) |    PM USHA: Component-3 Grants(To Strengthen Colleges) |    UGC: CPE(2nd Phase) |    NIRF 2025: All India Rank-93 |    DBT: Star College (Strengthening Component) |    DST: FIST |    ISO: 9001-2015 Certified College |    SGBAU: Identified as Lead College of University |    Career Katta :Centre of Excellence

करिअर संसद

करिअर संसद प्रतिनिधी :

क. महाविद्यालयातील प्रत्येक पदवी वर्गांचे सत्र २०२४-२०२५ शैक्षणिक सत्रात प्रवेशीत विद्यार्थी या निवडणुकीत मतदार म्हणून भुमिका बजावतील व आपल्या वर्गाचे प्रतिनिधी निवडतील.

ख. बिएस्सी, बिव्होक आणि बिसीए भाग १, २, आणि ३ चे विद्यार्थी त्यांचे दोन प्रतिनिधी (एक पुरुष + एक महिला) करिअर संसद सदस्य निवडून देतील.

ग. करिअर संसदेचे निवडून आलेले सदस्य अंतर्गत निवडणुकीद्वारे मंत्रिमंडळाचे गठन करतील.

घ. करिअर संसदेच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री, नियोजन मंत्री , कायदे व शिस्त पालन मंत्री, सामान्य प्रशासन मंत्री, माहिती व प्रसारण मंत्री, उद्योजकता विकास, रोजगार स्वयंरोजगार मंत्री , कौशल्य विकास मंत्री, संसदीय कामकाज मंत्री यांचा समावेश असेल तर इतर निवडून आले विद्यार्थी संसद सदस्य म्हणून कार्य करतील.

ङ. निवडणूकीद्वारे सदस्य निवडण्यासाठी वर्ग, प्रतिनिधी संख्या आणि मतदार -

अ.क्र.

वर्ग

प्रतिनिधी संख्या

मतदार

पुरुष

महिला

१.

बिएस्सी भाग १ (B)

या वर्गात सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित सर्व विद्यार्थी

२.

बिएस्सी भाग १ (MEB)

या वर्गात सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित सर्व विद्यार्थी

३.

बिएस्सी भाग १ (CS)

या वर्गात सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित सर्व विद्यार्थी

४.

बिएस्सी भाग १ (M)

या वर्गात सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित सर्व विद्यार्थी

५.

बिएस्सी भाग २ (B)

या वर्गात सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित सर्व विद्यार्थी

६.

बिएस्सी भाग २ (MEB)

या वर्गात सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित सर्व विद्यार्थी

७.

बिएस्सी भाग २ (CS)

या वर्गात सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित सर्व विद्यार्थी

८.

बिएस्सी भाग २ (M)

या वर्गात सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित सर्व विद्यार्थी

९.

बिएस्सी भाग ३ (B)

या वर्गात सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित सर्व विद्यार्थी

१०.

बिएस्सी भाग ३ (MEB)

या वर्गात सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित सर्व विद्यार्थी

११.

बिएस्सी भाग ३ (CS)

या वर्गात सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित सर्व विद्यार्थी

१२.

बिएस्सी भाग ३ (M)

या वर्गात सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित सर्व विद्यार्थी

१३.

बिव्होक भाग १

या वर्गात सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित सर्व विद्यार्थी

१४.

बिव्होक भाग २

या वर्गात सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित सर्व विद्यार्थी

१५.

बिव्होक भाग ३

या वर्गात सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित सर्व विद्यार्थी

१६.

बिसीए भाग २

या वर्गात सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित सर्व विद्यार्थी

१७.

बिसीए भाग ३

या वर्गात सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित सर्व विद्यार्थी

एकूण प्रतिनिधी संख्या

१७

१७

निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या जबाबदारी:

क. करिअर संसदेचे निवडून आलेले प्रतिनिधी हे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणारे प्रमुख घटक असतील. त्यांच्या जबाबदाऱ्या विविध आणि महत्त्वपूर्ण असतील. ते विद्यार्थ्यांच्या समस्या, तक्रारी, आणि सूचना व्यवस्थापनाला प्राधान्य देतील आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास मदत करतील. प्रत्येक प्रतिनिधीला आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी असेल, तसेच त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, आणि भावनिक गरजांची पूर्तता करण्यासाठी कार्य करावे लागेल.

ख. मंत्रिमंडळातील विविध मंत्री त्यांच्या पदांनुसार नियोजन, कायदे व शिस्त पालन, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण, उद्योजकता विकास, रोजगार स्वयंरोजगार, कौशल्य विकास, आणि संसदीय कामकाज या क्षेत्रांमध्ये नेतृत्व प्रदान करतील.

ग. प्रतिनिधींनी महाविद्यालयातील विविध कार्यक्रम, कार्यशाळा, आणि उपक्रमांचे आयोजन करणे, तसेच विद्यार्थ्यांच्या सहभागाची खात्री करणे अपेक्षित आहे. त्यांनी महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांमधील दुवा म्हणून कार्य करावे आणि महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी आपली भूमिका निभवावी. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे विद्यार्थ्यांचे कल्याण आणि महाविद्यालयाच्या विकासात सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता असेल.

करिअर संसद सदस्य पदाची निवडणूक लढण्यासाठी पात्रता:

क. उमेदवार सत्र २०२४-२५ मध्ये महाविद्यालयात प्रवेशित असावा.

ख. उमेदवाराची महाविद्यालयातील उपस्थिती ७० % हून अधिक असावी. अश्या स्वरूपाचे प्रतिज्ञापत्र विद्यार्थी देतील.

ग. उमेदवार करिअर कट्टा उपक्रमात नोंदणीकृत असावा. (विद्यार्थ्यांची करिअर कट्टा नोंदणी ३ वर्षांसाठी असते. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्याना उमेदवारी दाखल करायची आहे त्यांना मुदतीआधी नोंदणी करणे आवश्यक आहे).