महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असणाऱ्या “करिअर कट्टा” या उपक्रमांतर्गत महाविद्यालयामध्ये करिअर संसदेची स्थापना केली जाते. करिअर संसदेची स्थापना ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या संसदेच्या माध्यमातून विद्यार्थी नेतृत्व कौशल्ये, संघटनात्मक क्षमतांचे विकास, आणि निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळवतात
करिअर संसद विद्यार्थी स्वायत्तता, उत्तम संवाद कौशल्ये, आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा विकास करते. या संसदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या दिशेने एक सशक्त पायाभरणी घडवता येते, ज्यामुळे ते भावी आव्हानांना समर्थपणे तोंड देऊ शकतील. तसेच, या संसदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एकत्र येऊन सहकार्याने काम करण्याची आणि त्यांच्या समस्या, संधी आणि आव्हाने सामूहिक पद्धतीने सोडवण्याची संधी मिळते. अशा प्रकारे करिअर संसद विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याची उभारणी करण्यासाठी आणि त्यांच्यातील नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून देते.